Saturday, January 21, 2012

वेडे अव्यक्त का राहतेस का तू

माहित नाही काहीतरी उत्तरे देत जातीस  तू 
माझ्या  विचारण्यावर फक्त गूढतेने हसतेस तू 
अव्यक्ततेने व्यक्तता जपत जातेस  तू 
'तसे काहीच नाही' म्हणत मला गुंतवत जातीस तू 

गुंतता हृदयी मलाच वेडा ठरवतेस तू 
नयनी अश्रुना पुन्हा पुन्हा जवळ करत जातेस तू 
माझ्या खांद्यावर रडताना पुन्हा काहीतरी बोलतेस तू 
पुन्हा 'तसे काहीच नाही' एकवतेस तू 

मनाशी माझ्या संवाद करत जातेस तू 
शरीराने दूर राहुनीहि मला बिलगतेस तू 
विचारून आपल्या मना पाहतेस का तू 
खरेच 'तसे काही नाही' म्हणत वेडे अव्यक्त का राहतेस का तू 

प्रशांत  जगताप 
Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

मराठीसूची - Free Marathi Link Sharing

MARATHI MANDALI

”Marathi

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap