Monday, February 27, 2012

तुझे माझे अनुबंध (?)

बरेच काही असेच अपरोक्ष
माझ्यातला मी तुझ्यात गुंतवलेला
तुझ्यातला मी असाच झटकलेला ||


बरेच काही असेच  सापेक्ष
तुझ्यातून  पाहिलेला  मी मला
माझ्यातून  दिसलेली तू मला ||


तुझे  माझे अनुबंध (?) असेच   निरपेक्ष
न इच्छून  जुळणारे
इच्छून ही  न तुटणारे .....||


प्रशांत जगताप 

Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

मराठीसूची - Free Marathi Link Sharing

MARATHI MANDALI

”Marathi

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap