Thursday, March 1, 2012

दे रे दे ....दे ऐसे दान

दे रे दे  ....दे ऐसे दान
एका आकाशाचे रान

होऊन दे प्रत्येक स्वप्नाचे भान
चांदण्याच्या पाऊली येऊ दे गाण

दे रे दे.....दे  ऐसे  दान
एका आकाशाचे रान

होऊन दे प्रत्येक पंखाचे प्राण
ढगांच्या चाहुली येऊ दे त्राण

दे रे दे ......दे ऐसे दान
एका आकाशाचे रान

होऊन दे ह्या मनाचे पान
आकाशी उडून  भरून जाऊ दे रान 

दे रे दे ......दे ऐसे दान 
एका आकाशाचे रान 

प्रशांत जगताप


Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

मराठीसूची - Free Marathi Link Sharing

MARATHI MANDALI

”Marathi

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap